सातारा : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु झाले आहेत. देशात 21 दिवसांची संचार व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे खर्या अर्थाने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे झाले असून सातार्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जंतूनाशकांची फवारणी सुरु झाली आहे. अनेक स्वच्छतादूत यामध्ये परिश्रम घेत असून सातारा नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद काकडे, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील व अधिकारी परिश्रम घेत आहेत.
सातारा शहराच्या स्वच्छतेसाठी नवीन घंटागाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे सातारा शहरातील बकाल झालेल्या प्रभागांत नव्याने स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत असून लोकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आज प्रभाग क्र. 1 ते 5 परिसरातील पोवई नाका, कुबेर गणपती, सरकारी वसाहत, सदर बझार, उत्तेकर नगर परिसरात शीघ्र प्रतिसाद पथकाचे राकेश सोळवंडे तसेच सातारा नगरपरिषदेचे कर्मचारी यशवंत पिसाळ, जितेंद्र बाबर, अनिल अवघडे, नरेश वायदंडे व मुकादम किरण गाडे, शशिकांत कांबळे यांनी जंतूनाशक फवारणी केली. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचा धोका टळला आहे. सध्या अनेक ठिकाणी जंतूनाशक फवारणीची मागणी होत असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेकडे साधनसामग्री नसल्याने काही प्रभागात जाण्यास विलंब लागत आहे. ही फवारणी कष्टकरी, कामगार व हातावर पोट असणार्या श्रमिकांच्या वाड्यावस्तीत प्राधान्याने मारण्यात यावी. कारण त्यांच्याकडे जिवनावश्यक वस्तू आणण्यास पैसे नाहीत. सध्या संचार व जमावबंदीमुळे रोजगार बुडालेला आहे.
सातारा शहरात अनेक सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. परंतू त्यांनीही गोरगरीबांच्या वाड्यावस्तीत जंतूनाशकाची फवारणी करणे तसेच जिवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा करणे हे मानवता भावनेतून शक्य होणार आहे. यासाठी आता किमान आठवड्यातून एकदा तरी गरीबांना मदत व्हावी, अशी अपेक्षा कष्टकरी करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |