हैदराबाद : 26 वर्षीय शरत कोपू, या भारतीय विद्यार्थ्याचा मिजोरीच्या कन्सास सीटी येथील एका रेस्टॉरन्टमध्ये चोरीच्या उद्दैशाने आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडून हत्या केली. शरत हा मुळचा तेलंगणाचा असून तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तो युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी- कन्सास सिटीमध्ये शिकत होता. शरतने हैदराबादमधून सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये तो अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला होता. शिक्षण घेण्यासोबतच तो या रेस्टॉरंटमध्ये कामही करत होता. शरत याच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबाळीत जागीच त्याच्या मृत्यू झाला. सध्या पोलिसांच्या हाती त्या रेस्टारंटमधले सीसीटीव्ही फुटेज लागले असून. या फुटेजच्या माध्यमातून ते खुन्याचा शोध घेत आहेत. तसेच जी व्यक्ती या खुन्याबद्दल माहिती देणाऱ्याला पोलीस 10 हजार डॉलर्सचे बक्षिस देणार आहे.
शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडाने या संपूर्ण घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, शरत रेस्टारंटमध्ये बसलेला असताना अचानक काही हल्लेखोरांनी रेस्टॉरंटमध्ये गोळीबार सुरू केला. या गोळीबारीत शरतला पाच गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेय पण तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संदीपने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. संदीप आणि शरतच्या संपूर्ण परिवाराला स्वराज यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |