मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वीरेंद्र तावडे असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. त्यानेच हत्येचा संपूर्ण कट रचला होता, असे सीबीआयने म्हटले आहे. डॉ. दाभोलकरांवर दोघांनी हल्ला केला होता. यातील सचिन अंदुरे याने गोळ्या झाडल्या होत्या. त्याला पोलिसांनी अटक केली असून २६ ऑगस्टपर्यंत त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
विरेंद्र तावडेच्या मदतीनेच सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचला होता. सीबीआयने सचिन अंदुरेला शुक्रवारी दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर, आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात त्यास हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. आरोपीला कुठलाही पुरावा नसताना अटक केल्याचे सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी कोर्टात म्हटले आहे. मात्र, सचिनच्या तपासात विरेंद्र तावडेच या खूनामागील मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयमधील सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तावडेला काढायचा होता शस्त्रांचा कारखाना
200पेक्षा अधिक ई-मेल्सद्वारे अकोलकर आणि तावडेमध्ये संपर्क झाला आहे. या दोघांनी मध्य प्रदेशामधून बेकायदा शस्त्र खरेदी करण्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली असून गावठी कट्टे आणि विदेशी अग्निशस्त्र विकत घेण्याबाबत विचारविनिमयही केल्याचे समोर आले आहे. शस्त्र निर्मितीसाठी छोटासा कारखाना टाकण्यासंदर्भात त्यांचे काही नियोजन होते का, याबाबत सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |