फलटण : स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे फलटण येथील सुविधा हॉस्पिटल येथे आले होते. त्यावेळी श्रीमंत उदयनराजे म्हणाले की दिगंबर आगवणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. येत्या 23 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा येथे काही कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. त्यावेळी आगवणे यांच्याविषयी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर आगवणे यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मार्ग काढणार आहोत.
याबाबत अधिक माहिती अशी की स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे हे गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथील अधिकारी गृहा समोर त्यांच्या काही मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसले होते. उपोषणाच्या सहाव्या दिवशी पोलीस प्रशासन उपोषण दडपत असल्याचा आरोप आगवणे यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर दिगंबर आगवणे यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दिगंबर आगवणे हे फलटण येथे उपचार घेत असल्याचे समजताच खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे फलटण येथील काही खाजगी कार्यक्रमांसाठी आले होते. त्याच वेळी त्यांनी दिगंबर आगवणे यांना समक्ष भेटून यांच्या तब्येतीची विचारपूस केली व दिगंबर आगवणेंना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू असे आश्वासनही यावेळी खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी दिले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुशांत निंबाळकर, डॉ. जे. टी. पोळ, अरुण आंबोले, रवींद्र बर्गे आदी उपस्थित होते.दरम्यान छ. उदयनराजे हे आगवणे यांना भेटण्यासाठी येणार आहेत हे समजताच हॉस्पिटल परिसरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |