कराड : कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सादर केलेल्या शपथपत्रात अपुर्ण व खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी मुख्याधिकार्यांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असतानाही मुख्याधिकार्यांनी जाणीवपूर्वक आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईच्या व मुख्याधिकार्यांच्या विरोधात आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी आज (शुक्रवारी) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कराड नगरपरिषदेच्या नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणूकीत मी प्रभाग आठमधून निवडणूक लढवताना निवडणूकपूर्व शपथपत्रात संपत्ती व उत्पन्नाची माहिती अपूर्ण व खोटी दिली असल्याची तक्रार इम्तीयाज बागवान यांनी जिल्हाधिकार्यांच्याकडे दिली होती. याबाबत चौकशी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सविस्तर चौकशी करुन आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. व अर्जदार बागवान यांना योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याबद्दल अहवाल दिला आहे. त्यावर जिल्हाधिकार्यांनी व चौकशी अधिकार्यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले असताना माझ्यावर गुरूवारी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक चौकशी अधिकार्यांसमोर आपण या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर म्हणणे मांडले होते. निवडणूक पूर्व शपथपत्रात काही मिळकतींचा उल्लेख मी केला नसल्याचा तक्रारदार बागवान यांचा आक्षेप होता. वास्तविक नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीपुर्वी त्या मिळकती रजिस्टर दस्ताने विक्री केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा उल्लेख शपथपत्रात केलेला नाही. तथापी संबधित खरेदीदाराने त्या मिळकतींची नोंद सात बारा उतार्यावर न केल्याने त्या माझे व माझ्या कुटूंबियांच्या नावे दिसत आहेत. मात्र चौकशी अधिकार्यांसमोर म्हणणे मांडत असतांना या मिळकतींच्या खरेदी दस्ताचे पुरावे सादर केलेले आहेत. निवडणूक लढवताना शपथपत्रात संपूर्ण सत्य व खरी माहिती दिली असून कोणतीही माहिती लपवलेली नाही.
चौकशी अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यात तक्रारदाराच्या तक्रारीतील आठ मुद्यांचा उल्लेख करत या मुद्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच या तक्रारीबाबत भारत निवडणूक आयोगाकडील पत्रास अनुसरुन तक्रारीची शहानिशा करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकार्याला नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदाराने याबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागणे उचित ठरेल असे म्हटले आहे.
असे असतांना तक्रारदार इम्तीयाज बागवान यांनी प्रशासनाकडे तगादा लावत संबंधित तक्रारीवर निर्णय देण्याची मागणी केली. त्यांनी 20 नोव्हेंबर 2017 रोजी मुळ तक्रार जिल्हाधिकार्यांच्याकडे केली होती. त्यावर 5 डिसेंबर 2017 रोजी चौकशी अधिकारी म्हणून प्रांतांची नियुक्ती करण्यात आली. प्रांताधिकार्यांनी सुनावणी घेवून दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यात तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याबाबत उल्लेख केला आहे. तरीही निर्णय देण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे करत बागवान यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तक्रारदाराच्या दबावापोटी प्रशासनाने तात्काळ 17 जुलै 2019 रोजी मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी अधिकारी यांच्या अहवालाप्रमाणे उचित कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत असे असताना नगरपालिका प्रशासनाने कोणतीही खातरजमा व अधिकाराची चौकशी न करता आपल्याविरुध्द घाईगडबडीत गुन्हा नोंद केला आहे. अशा प्रकार गुन्हा दाखल करण्याचा नगरपालिका प्रशासनास अधिकार नाही व तसे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिलेले नाहीत.
दि.20एप्रिल 2014 च्या भारत निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये शपथ पत्रामधील मजकूराबाबत तक्रार आल्यास तक्रारदार इसमाने योग्य त्या न्यायालयात दाद मागणे जरुरीचे आहे. या निवडणूक आयोगाच्या निर्देशांचा जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्यांनी विचार केलेला दिसत नाही. संबधित तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रीयेला आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |