RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

20 June 2019 at 00:10

आपला अनोखा 'सर्विस ऑन व्हील्स' ट्रक आणला सातार्‍यात

सातारा : मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील 25 शहरांमध्ये सुमारे 2500 किमीचे अंतर पार करणार्‍या पहिल्या पर्वाच्या यशानंतर अहमदनगरमधून या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. अहमदनगरमधून सुरुवात झाल्यानंर सांगली आणि रत्नागिरी असा प्रवास करून या दोन दिवसीय टप्प्याची सांगता सातार्‍यात (18 आणि 19 जून) झाली. थेट डिलरशीप नसलेल्या द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरातील ग्राहकांच्या अधिक समीप जाण्याचा उद्देश या अनोख्या ग्राहककेंद्री उपक्रमामागे आहे. जुलै 2016 मध्ये सादर झालेल्या ममाय मर्सिडीज, माय सर्विसफ या मर्सिडिज-बेन्झच्या अत्यंत लोकप्रिय अनोख्या सेवा विभागाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जातो. अत्याधुनिक मसर्विस ऑन व्हील्सफ ट्रकमुळे या भागातील ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरवल्या जातील.

बी.यू. भंडारीचे डीलर प्रिन्सिपल देवेन भंडारी म्हणाले, गेल्या दशकभरापासून आम्ही मर्सिडिज-बेन्झसोबतची ही अभिमानास्पद भागीदारी जपली आहे आणि भारतातील या ब्रँडच्या यशोगाथेत एक महत्त्वाचा भाग म्हणून हे दृढ बंध कायम राखताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्यासाठी हे महत्त्वाचे वर्ष आहे, कारण मर्सिडिज-बेन्झ यंदा भारतात 25 वर्षे पूर्ण करत आहे. एक स्पर्धात्मक वैशिष्ट्य म्हणून ग्राहकसेवा आणि ग्राहकांचा आनंद या बाबींना महत्त्व देण्याचे तत्व आम्ही मर्सिडिज-बेन्झप्रमाणेच बी.यू. भंडारीमध्ये बाळगले आहे. त्यामुळे, उत्कृष्ट सेवेचे नवे मापदंड स्थापित करण्यास आम्ही बांधिल आहोत. मसर्विस ऑन व्हील्सफसारख्या अनोख्या उपक्रमासह, जिथे आमची थेट उपस्थिती नाही अशा भागात मर्सिडिज-बेन्झ बाळगणार्‍या ग्राहकांना आम्ही पूर्ण मन:शांती मिळेल याची खात्री देतो. आजवरचा ग्राहक प्रतिसाद फारच छान आहे आणि या भागातील ग्राहकांना सेवा देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे.

मसर्विस ऑन व्हील्सफ हा भारतातील लक्झ्युरी कार बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेला या प्रकारचा पहिला ग्राहककेंद्री उपक्रम आहे. मर्सिडिज-बेन्झ इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेल्या बिझनेस इनोव्हेशन प्रकल्पाचा हा परिपाक आहे. सूचना दिल्यानंतर मोबाइल सर्विस ट्रक ग्राहकाच्या भागात पोहोचेल आणि तिथे संबंधित गाडीची तपासणी, दुरुस्ती व सर्विस केली जाईल. यामुळे, ग्राहकाची सोयही होते आणि त्याला किंमतीचे अधिक चांगले मोल मिळते.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before