सातारा : जावलीच्या कार्यक्रमात आता मनोमीलन कायमचे तडीपार केले आहे. पुन्हा तडजोड नाही. मला अडवण्याची कुणात धमक नाही, असे जाहीर विधान करून आ. शिवेंद्रराजेंनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बॅँकेच्या सभागृहात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा हात हातात घेवून तलवारीने केक कापला. दोघांनीही दोन वेगवेगळ्या तलवारी उंचावल्या.
जावलीच्या कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे संकेत दिले. आता तडजोड नाही, असे सांगत आ. शिवेंद्रराजेंनी भविष्यातील वाटचाल अधिक आक्रमक असल्याचे सूचित केले. इकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह आ. शिवेंद्रराजे भोसले या मेळाव्यास उपस्थित होते.
मेळाव्यातील मान्यवरांच्या भाषणानंतर विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा केक मांडण्यात आला. या केकवर दोघांचीही नावे होती. कार्यकर्त्यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हातात तलवार दिली. तर रामराजेंच्या हातातही दुसरी तलवार देण्यात आली. दोघांनीही तलवारीला हात लावून वाढदिवसाचा केक कापला व पुन्हा आपापल्या तलवारी उंचावल्या.
कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जि.प. सदस्य प्रदीप विधाते, संचालक कांचन साळुंखे, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ, प्रकाश बडेकर, राजेंद्र राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |