हैदराबाद : नुकतीच हैदराबादमध्ये एका अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेनं हैदराबादसह संपूर्ण देशालाच हादरा दिला. हैदराबादच्या जनतेतून या घटनेविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. आरोपींना लवकरात लवकर धुंडाळून काढून कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होतेय. याच घटनेविषयी बोलताना तेलंगना सरकारच्या एका मंत्र्यांचा तोल ढासळलेला दिसून आला.
तेलंगना सरकारमध्ये कामगार मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे मल्ला रेड्डी यांनी या घटनेची तीव्र निंदा केली. तसंच या घटनेतील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. मात्र यावेळी 'आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून त्याचा एन्काऊन्टर करणार' असं एक वक्तव्य मंत्री महोदयांच्या तोंडून निघालं.
हैदराबादच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी. आम्ही त्याला अटक करू आणि एन्काऊन्टर करू, आम्ही आरोपीला सोडणार नाही, असं म्हणताना मंत्रीपदावर असणाऱ्या रेड्डी यांचा तोल ढळलेला दिसून आला. लवकरच आपण पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरएक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही रेड्डी यांनी दिलं.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |