12:51pm | Sep 22, 2020 |
बुध: यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पेरणीमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. काही बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हेही दाखल झाले. हा सगळा सोयाबीनच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी शेतकर्यांनी घरीच सोयाबीन बियाणे तयार करावे, असे आवाहन कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी केले.
नवलेवाडी (ता.खटाव) येथे कृषी विभागातर्फे आयोजित सोयाबीन शेतीशाळेत सोयाबीन पेरणीपूर्व व काढणीपश्चात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करताना श्री. म्हेत्रे बोलत होते. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे, कृषि पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, कृषी सहाय्यक बाळासाहेब भोईटे, सरपंच शहाजी निकम, दीपक पवार, नितीन शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. म्हेत्रे म्हणाले की, सोयाबीन बियाणे तयार करणार्या कंपन्यावर गुन्हे दाखल झाल्याने पुढील वर्षी सोयाबीन बियाणाचा पुरवठा करणार्या कंपन्या बियाणे न देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या खरिपावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कृषी विभागाने आत्तापासूनच तयारी सुरु केली असून, यावर ‘ग्रामबिजोत्पादन’ अर्थात घरच्या घरी बियाणे तयार करणे हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. तसेच सोयाबिनची मळणी करताना मळणी मशीनचा वेग 300 ते 400 आर.पी.एम एवढा असावा तसेच सोयाबीन मधील आद्रतेचे प्रमाण 13% एवढे असावे. साठवणुक 60 किलो बॅगेमध्ये भरून हवा खेळती राहील अशा पद्धतीने बॅगाची रचना करावी.
यावेळी कृषी सहाय्यक भोईटे यांनी शेतीशाळचे सूत्रसंचालन केले. सचिन लोंढे यांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शानाखाली नवलेवाडीत सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. कोळेकर यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |