12:47pm | May 18, 2021 |
नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) कोविडच्या उपचारांतून 'प्लाझ्मा थेरेपी'चा वापर हटवण्याचा निर्णय घेतलाय. आयसीएमआरच्या नव्या आदेशानुसार, देशात यापुढे कोविड रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार नाही.
कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अनेक जणांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात आला आहे. परंतु, त्यानंतरही संक्रमितांचा मृत्यू आणि आजाराची गंभीरता कमी होण्यास मदत झालेली दिसून आली नाही. आयसीएमआर, कोविड १९ वर गठीत करण्यात आलेली नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी महत्त्वाची, असा समज असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा मोठा फायदा होत नसल्याचं मत अनेक घटकांतून व्यक्त झाल्यानंतर या थेरपीची शिफारस यापुढे न करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आलाय. आयसीएमआरची एक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली होती. प्लाझ्मा थेरपीचा मर्यादित उपयोग व अनेकदा या उपायाचा अयोग्य वापराच्या बाबी लक्षात घेता तिच्या वापराची शिफारस थांबवावी, असं मत या बैठकीत एकमुखानं व्यक्त करण्यात आलं. त्यानुसार उपचारांच्या मार्गदर्शक तत्वांमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला, अशी माहिती आयसीएमआरतर्फे रात्री देण्यात आली.
टास्क फोर्सनं कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार, कोविड रुग्णांना तीन प्रकारांत विभागण्यात आलंय.
पहिला : अगदी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दुसरा : मध्यम तीव्रतेची लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना कोविड वॉर्डमध्ये दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तिसरा : गंभीर लक्षणं असलेली रुग्ण - या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |