07:43pm | Mar 04, 2021 |
फलटण : फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करताना पूर्वीचे सर्वेक्षण व रेल्वेच्या ताब्यात असलेल्या या मार्गावरील जमिनींचा विचार करुन पूर्वीचा मार्ग कायम राहील अशा पद्धतीने सर्वेक्षण करण्याबाबत स्पष्ट निर्देश पुणे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.
विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक पुणे येथे संपन्न झाली. त्यावेळी डिव्हिजनल मॅनेजर रेणू शर्मा, ऍडिशनल डिव्हिजनल मॅनेजर सारेश भाजपे, सीनियर डिव्हिजनल मॅनेजर (ऑपरेशन) डॉ. स्वप्निल नीला, श्याम कुलकर्णी, डिव्हीजनल मॅनेजर (कमर्शिअल) नजीब मुल्ला, सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री श्री निवास उपस्थित होते.
अनेक वर्षापासून रेंगाळलेला फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर प्रयत्नशील आहेत. सुमारे 2 महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटून त्यांनी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी आदेश देऊन या मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल तात्काळ मागविला आहे.
आजच्या बैठकीत या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे, त्याबाबत काही अडचणी आहेत काय याची विचारणा करण्यात आली. प्रामुख्याने जुना सर्व्हे झाल्याप्रमाणे रेल्वे गेली पाहिजे, अशी ठाम भूमिका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या बैठकीत आग्रहपूर्वक मांडली. पूर्वीच्या मार्गाव्यतिरिक्त नवीन रेल्वे मार्ग सर्वेक्षणामध्ये अनेक गावाला त्रासदायक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेकांची राहती घरे, शेतजमिनी बाधीत होत आहेत, व्यवसायिकदृष्ट्याही ही बाब योग्य नसल्याची भूमिका घेत खा, नाईक-निंबाळकर यांनी जुन्या रेल्वे मार्गाला पाठींबा देत त्याच मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करुन अहवाल त्वरित पाठविण्याच्या सूचना संबंधीत अधिकार्यांना केल्या आहेत.
फलटण-बारामती रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर माहिती घेऊन सर्वांना योग्य मोबदला मिळेल यासाठी रेल्वे अधिकार्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग जुन्या निर्धारित मार्गानेच करावा लागेल, असे सक्त आदेश रेल्वे विभागाला या बैठकीत देण्यात आले. प्रस्तावित असलेल्या हैद्राबाद-मुंबई बुलेट ट्रेन मार्गाबाबत या बैठकीत चर्चा झाली. फलटण-पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरु करणेबाबत काही अडचणी आहेत काय, असतील तर त्या तातडीने दूर करुन या मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था तातडीने करावी. लवकरच रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल व अन्य मान्यवरांच्या हस्ते फलटण-पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खा. नाईक-निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
माढा तालुक्यातील रेल्वे थांब्याच्या संदर्भामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कांबळे यानी सुचविलेल्या कामाबद्दल चर्चा करुन त्यांनी दिलेले प्रस्तावमार्गी लावण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |