04:10pm | Mar 13, 2021 |
नवी दिल्ली: शताब्दी एक्स्प्रेसच्या एका बोगीत अचानक आग लागल्याने ‘द बर्निंग ट्रेन’ चा थरार पहायला मिळाला. प्रसंगावधान दाखवत अधिकार्यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
शताब्दी एक्स्प्रेस दिल्लीवरून देहरादूनच्या दिशेने निघाली होती. अचानक एका बोगीमध्ये आगीचा भडका उडाला. गाडी धावत असतानाच इंजिनपासून आठव्या बोगीत आग लागली. काही वेळातच बोगीमध्ये झपाट्याने आग पसरली लागली. मात्र, घटनेची माहिती मिळताच इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवून तातडीने बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
देहरादूनला जात असलेल्या एक्स्प्रेस गाडी रायवाला कानसरो दरम्यान असताना सी 4 बोगीमध्ये आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अधिकार्यांनी सांगितलं आहे. बोगीला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत गाडी तातडीने थांबवण्यात आली. बोगीतून प्रवास करणार्या 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतरआग वाढत असताना बोगी वेगळी करण्यात आली.
त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. तर बोगीतील प्रवाशांना दुसर्या बोगीत हलवण्यात आलं. त्यानंतर गाडी पुन्हा देहरादूनच्या दिशेने रवाना झाली. कानसरोजवळ ही घटना घडली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. या आगीत पूर्ण बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आसनाबरोबरच संपूर्ण बोगीचा जळून कोळसा झाला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |