04:01pm | Jul 21, 2020 |
लखनऊ: मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. लखनऊच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
टंडन यांना 11 जूनला मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर 15 जूनला त्यांची प्रकृती आणखी खराब झाली. पोटात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांचे निधन झाले.
टंडन हे मागच्या पिढीचे दिग्गज नेते होते. वयाच्या 12 व्या वर्षीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय राहणार्या लालजी टंडन भाजप सरकारमध्ये मंत्री होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळच्या व्यक्तिंपैकी ते एक होते. लालजी टंडन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खंदे समर्थक मानले जात असत. 1978-84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते.
तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. लालजी टंडन यांनी 2009 मध्ये लखनौ मतदारसंघातून काँग्रेस नेत्या रिता बहुगुणा जोशी यांचा 40 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. ही जागा अटल बिहारी वाजपेयी यांनी 1991 पासून सलग चार वेळा राखली होती. लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |