01:00pm | Sep 01, 2022 |
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच या कुप्रसिद्ध गॅँगमधील दाऊदच्या इतर साथीदारांवरही एनआयएने बक्षीसे जाहीर केली आहेत. दाऊद इब्राहिम कासकरला संयुक्त राष्ट्रांनी आतंरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मुंबईमध्ये 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी आहे. दाऊद पाकिस्तानातील कराचीत असून तथून तो त्याचे गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याची चर्चा आहे.
दाऊद आणि त्याचे साथादीर 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी वॉन्टेड आरोपी आहेत. 'डी' गँगविरोधात एनआयएने फेब्रुवारीत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आता त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. दाऊदची अचूक माहिती देणाऱ्याला आणि त्याच्या अटकेला मदत करणाऱ्याला हे बक्षीस देण्यात येणार आहे.
दाऊदसह त्यांच्या जवळच्या इतर साथीदारांवरही एनआयएने बक्षीसांची घोषणा केली आहे. एनआयएने दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ हाजी अनीसवरही बक्षीस जाहीर केले आहे. त्याचे सहकारी जावेद पटेल उर्फ जावेद चिकना; शकील शेख उर्फ छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन यांच्यावरही बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. दाऊदवर 25 लाख रुपये बक्षीसाची रक्कम आहे. तर छोटा शकीलसाठी 20 लाख रुपये आणि अनीस, चिकना आणि मेमनसाठी प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
शस्त्र तस्करी, दहशतवाद पसरवणे, अमली पदार्थ तस्करी, गुन्हेगारी सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, दहशतवाद्यांसाठी निधी उभारणे, मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेण्यासाठी धमकावणे, खंडणी, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना मदत पुरवणे यासारखे अनेक आरोप या गँगवर आहेत. लश्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेचे या गँगशी संबंध असल्याचेही एनआयएकडून सांगण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |