कराड : दोनच दिवसांपूर्वी अल्पवयीन युवकाचा कराडमध्ये खून झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका युवकाचा धारदार शस्त्राने व फरशी डोक्यात घालून खून झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार दि. 15 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कराडच्या भाजीमंडईमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30, रा. गुरुवार पेठ, कुरेशी मोहल्ला, कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री जुबेर व संशयितांमध्ये कराडच्या भाजी मंडईत भांडण झाले. यामध्ये संशयितांनी धारदार हत्याराने तसेच फरशीने जुबेरला गंभीर मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने जुबेर याच्या शरीरातून तसेच डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यामुळे जुबेर जमिनीवर कोसळला. त्यानंतर संशयित मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच काही लोकांनी जखमी जुबेरला रिक्षातून उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, तिघेजण संशयित मारेकरी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची फिर्याद जाबीर आंबेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून संबंधित तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |