12:31am | Jun 02, 2020 |
सातारा : कुरवली खुर्द, ता. फलटण येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या आठ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बबन पवार, रा. जिंती नाका, ता. फलटण, आदेश जालिंदर जाधव, रा. वाठार निंबळक, ता. फलटण, विनोद रामभाऊ मदने, रा. धुळदेव, ता. फलटण, सुखदेव हिरालाल जाधव, रा. जिंती नाका, ता. फलटण, वैभव संजय निंबाळकर, रा. चिंचुर्णी, ता. फलटण, मालोजी उर्फ पप्पू बाळू जाधव, रा. जाधववाडी, ता. फलटण, नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर, रा. तावडी, ता. फलटण, तानाजी जाधव, रा. धुळदेव, ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत १४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना केल्या होत्या. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
दि. १ जून रोजी सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दु. १२ वाजण्याच्या सुमारास कुरवली खुर्द, ता. फलटण येथील बाणगंगा धरणाच्या पात्रात छापा टाकला असता त्याठिकाणी वरील आठ जण ६ ट्रॅक्टर ट्रॉली व एक ७०९ टेम्पोच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. वाळुबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण बेकायदेशीर वाळूची चोरी करीत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याकडून १४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आठ पैकी एक जण फरार झाला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |