पुसेगाव : रिपब्लिकन पक्षाची आठवले गट जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या अनुषंगाने खटाव तालुक्याची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले यांनी दिली.
वडुज येथील गेस्ट हाऊस खटाव तालुक्यातील भिमसैनिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी निवडी पुढीलप्रमाणे करण्यात आल्या. खटाव तालुका उपाध्यक्ष युवराज रणदिवे औंध, ता. उपाध्यक्ष संदीप काळे मोळ, ता. सरचिटणीस शुभम राऊत लाडेगाव, ता.अध्यक्ष विक्रमराज डोईफोडे गोरेगाव, पुसेगाव शहर अध्यक्ष सुजल मसणे, ता.संपर्कप्रमुख अजिंक्य वाघमारे कान्हरवाडी, ता. सचिव सदानंद तोरणे म्हासुर्णे, सचिव प्रविण बुचडे अंभेरी, संघटक जितेंद्र सोनवले जांब, खजिनदार सुरज मिसळे पेडगाव, सुरज जगताप ता. कार्याकारणी सदस्य नेर.
यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. खटाव तालुक्यात एकही जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती साठी राखीव न झाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण रिपब्लिकन पार्टी ऑफ (आठवले) गट जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. यावेळी वकील संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ड. शाहनवाज काझी यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आज बहुतांश मुस्लिम समाज चालत आहे. येणार्या काळात प्रत्येक गावात शाखा काढायचं ठरवलं आहे. भिमसैनिकां सोबत आता तालुक्यातील मुस्लिम समाज जोडणार आहे असे सांगितले. समाजातील प्रत्येक गोर गरीब लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रिपाईच्या वतीने केला जाईल. प्रत्येक कार्यकर्ता यांनी समाजातील लोकांच्या अडचणी समजून सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संघटना वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असे महिला नेत्या गौतमी मसणे यांनी सांगितले. पदाधिकारी यांनी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहणं बंधनकारक आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून पक्षाचे महत्त्व सांगितले पाहिजे. पदाधिकारी यांच्या पाठीशी आता रिपब्लिकन पक्ष आहे. कोणत्याही पदाधिकारी यांनी घाबरून जाऊ नये. जसा तसं उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. घराघरात भिमसैनिक तयार करणार आहोत, असे खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते विठ्ठल नलवडे, सुनिल मिसाळ, अजित कंठे, माजी सरपंच शिवाजी तिडके, ग्रामपंचायत सदस्य मोहन तुपे, भिमा सावंत, पतंग खरात, गणेश यादव, प्रकाश बनसोडे, महेश कोकटे, समाधान जाधव, तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |