06:27pm | Jan 22, 2021 |
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल, ता. कराड यडथील श्री खंडोबा यात्रा रद्द करण्याचे आदेश पारीत केले असून यात्रा कालावधीत मंदीर बंद राहणार असल्याची माहिती उंबरज पोलीस ठाण्याचे सपोनि ए. एल. गोरड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
दि. 23 जानेवारी ते दि. 29 जानेवारी 2021 या कालावधीत पाल, ता.कराड येथील श्री खंडोबा यात्रा तिथीप्रमाणे आयोजित करण्यात येणार होती. यात्रेचा मुख्य दिवस दि. 25 जानेवारी रोजी होता. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रा भरल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होवून सामाजीक अंतराचे पालन होणार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यात्रेत छोट्या मोठ्या विक्रेत्यांसह मनोरंजनाचे खेळ येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी संभाळणे कठीण आहे. यावर्षी पाल यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या निर्णयानुसार कराड येथील उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.
यात्रा कालावधीत श्री खंडोबा देवाची पुजा- अर्चा, धार्मिक विधी केले जाणार असुन त्यानंतर यात्रा कालावधीत मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. दि.23 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये देवस्थान व पाल परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने स्टॅल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी येणार्या सासन काठ्या, पालख्या, बैलगाड्या यांना बंदी घालण्यात आली आहे. दि. 31 जानेवारी रोजी पाकळणीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सुद्धा धार्मिक विधीनंतर श्री खंडोबा मंदीर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने पारित केले आहेत. कोणत्याही प्रकारची गर्दी, धार्मिक अथवा सांस्कृतीक कार्यक्रम, मिरवणूकांचे आयोजण करण्यास मनाई करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम पार पाडताना मंदीराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य व मानकरी उपस्थित राहतील दि. 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान पाल गावासह दहा कि. मी. परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |