03:49pm | Nov 28, 2020 |
फलटण: फलटण तालुका शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर बंद अवस्थेत असलेला डीपी पुन्हा सुरू झाला. सालपे येथील शेतकर्यांनी याबाबत फलटण तालुका शिवसेना प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. डीपी कार्यान्वित झाल्याने या परिसरातील शेतकर्यांना सुरळीत वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांनी प्रदिप झणझणे यांचे आभार मानले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील सालपे येथील शेतकर्यांची तक्रार शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आली होती. तक्रारीनुसार डिपी चोरीला जाऊन दोन महिने झाले तरी सालपे येथील गायकवाड डिपी बसवून दिला नसल्याने तेथील स्थानिक शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाले होते. विहीरीत पाणी असुनही वीज पुरवठ्याअभावी लाभ घेता येत नव्हता. शेतपीकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सालपे येथील शेतक-यांनी सदर समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेकडे संपर्क केला होता.
त्यानुसार सालपे येथील शेतकरी समस्येची दखल घेत शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी बारामती येथील वीज महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन सदर विषयावर घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे फलटण तालुका वीज महावितरणने शेतकरी समस्येची दखल घेत दि.27/11/2020 रोजी ट्रान्सफॉर्मर जोडुन शेतकर्यांना वीज पुरवठा सुरळीत करुन दिला आहे. याबद्दल सालपे येथील जागरुक शेतकर्यांचे शिवसेनेच्यावतीने फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी विशेष जाहीर आभार मानले.
डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेला की वीज महावितरणने दोन दिवसात डिपी बसवणे बंधनकारक आहे. डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेल्यास वीज महावितरणने डिपी बसवण्यासाठी पैसे मागितल्यास तात्काळ शिवसेनेकडे संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेच्यावतीने फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे. कारण बारामती वरिष्ठ कार्यालयाने फलटण वीज महावितरण कार्यालयास शेतकर्यांकडुन डिपी बसवण्यासाठी पैसे घेऊ नका असे सक्त आदेश दिले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. जरी कोणी पैशाची मागणी केली तरी शिवसेनेकडे संपर्क साधावा म्हणजे जेणेकरून संबंधितावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करता येतील किंवा लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल व जुल्मी-अन्यायाकारी पद्धतीस आळा घालुन चोख बंदोबस्त करता येईल.
फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्रपुर्वक विनंती करतो की, जिथे कुठे समस्या येईल तेव्हा फलटण तालुका शिवसेनेकडे नक्की संपर्क करा. समस्या कोणतीही असो, फक्त योग्य असावी. फलटण तालुका शिवसेना फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 12 महिने 24 तास नम्रपुर्वक कटीबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |