08:41pm | Jan 25, 2022 |
सातारा : येथील जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा विशेष शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर झाले. गेल्या ३२ वर्षाच्या सेवाकालात त्यांना ५०० बक्षिसे मिळाली आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये सातारा जिल्हा पोलिस दलाच्या जिल्हा विशेष शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. संभाजी बनसोडे हे दि. २५ ऑगस्ट १९९० मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पाचगणी येथील पोलीस ठाण्याच्या विशेष पथकामध्ये उत्कृष्ट काम केले.सन २०१० मध्ये सातारा येथील विशेष पथकात कार्यरत असताना काही दरोडेखोर सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांनी दरोडेखोरांना पकडण्याची मोलाची कामगिरी केली होती. सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात सापळा कारवाईमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. २०१६ मध्ये त्यांना अति उत्कृष्ट सेवेबाबत मुंबई पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक प्राप्त झाले होते. सध्याचे पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत. सन २०२० मध्ये प्रशंसनीय सेवेबाबत त्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पदक जाहीर केले. या पत कांबळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवल्याचे मानण्यात येते. गेल्या ३२ वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये संभाजी सुदाम बनसोडे यांना एकूण ३६० बक्षिसे प्राप्त झाली आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |