वाई : हनीट्रॅप च्या जाळ्यात अडकवून बदनामीची भीती दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह दोघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुनम हेमंत मोरे व हेमंत विजय मोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिकमाहिती अशी की, पतसंस्थेत शिपाई पदावर काम करणाऱ्या जितेंद्र सोपान जाधव वय (वय ३० रा. बोपेगाव, ता. वाई) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या कार्यालयात एका महिलेने मला नोकरीची गरज आहे येथे नोकरी मिळणार मिळेल काय असे सांगून जाधव यांचा त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला यानंतर त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवून त्यांना एका हॉटेलात भेटायला बोलाविले.
यानंतर या महिलेच्या पतीने माझ्या पत्नीला अश्लील मेसेज का पाठवले, असे सांगून दमदाटी करून बदनामीची धमकी देऊन त्यांच्याकडून 2 लाख ८९ हजार ५०० रुपये उकळले. यानंतर पुन्हा बदनामीची व ठार मारण्याची धमकी देऊन पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. यानंतर जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पुनम हेमंत मोरे व हेमंत विजय मोरे (मूळ गाव ओझर्डे, ता. वाई हल्ली रा. कुडाळ, ता. जावली) यांना अटक केली आहे. या दोघांनी आणखी काही जणांना जाळ्यात अडकवून फसवले असून त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, या दोघांव्यतिरिक्त त्यांनी अनेकांना फसविले आहे. त्यांनी वाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाई बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |