लखनऊ: आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिस्ट्रीशीटर विकास दुबे याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणण्यात येत होतं. यावेळी एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. याच गाडीत विकास दुबे बसला होता. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबेनं पोलिसांवर गोळीबार केला. तो पळून जात असलेला पाहून पोलिसांनीही त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या दरम्यान दुबे जखमी झाला आणि थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केलाय. या घटनेत चार पोलीस जखमी झाल्याची माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली आहे. कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला काल गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |