सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने अशोक शंकर माने वय 25 राहणार ढोनी, तालुका पाटण याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सातारा जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी हे आदेश दिले. या केस मध्ये एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले.
या खटल्याची माहिती अशी, ढेन, तालुका जावली येथील अल्पवयीन मुलीवर नात्याने तिचा दाजी असलेल्या आरोपी अशोक माने याने जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारामुळे सदर मुलगी गरोदर राहिली होती. सदर मुलीच्या वडिलांच्या कडून हा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
विशेष सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांच्या कोर्टात हा खटला चालू होता. सरकारी वकील नितीन मुकेश यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यामध्ये तेरा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी माने याला अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून पोस्को कलम 3 व 4 अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. या या खटल्याच्या कामासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, प्रोसेक्युशन स्कॉड चे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक आर एल फरांदे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, पोलीस हवालदार गजानन फरांदे, सुधीर खोडे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी मदत केली.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |