01:39pm | Jun 25, 2021 |
फलटण: फलटण शहरातील नगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटविण्यात यावे, अन्यथा सोमवार दि.28 जून पासून नगरसेवकांसह मुख्याधिकार्यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोक जाधव यांनी निवेदाद्वारे दिला.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे, फलटण शहरात नगरपालिकेकडून राजधानी टॉवर बांधण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात न हटवल्यास सोमवार, दि. 28 जून पासून सर्व विरोधी नगरसेवकांसह मुख्याधिकार्यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार आहे.
फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टोवरमधील अनियमित बांधकाबाबत आंदोलनाची नोटीस दि.1 जून रोजी आम्ही दिली होती. त्यावर मुख्याधिकार्यांनी 20 दिवसात संबंधित कार्यालयाची परवानगी न मिळाल्यास सत्वर कारवाई करु असे आश्वासन दिले होते. याबाबत दि.21 जून रोजी मुख्याधिकार्यांकडे विचारणा केली असता सहाय्यक संचालक नगररचना, सातारा यांनी दि.18 जून रोजीच्या पत्राने बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्याधिकार्यांकडून सांगण्यात आले. तथापी, दि.23 जून रोजी सहाय्यक संचालक, नगररचना, सातारा यांनी दि. 18 जून रोजी दिलेली परवानगी रद्द समजण्यात यावी असे पत्र
मुख्याधिकार्यांना व आम्हाला दिले आहे. त्यावरुन सदरचे बांधकाम हे बेकायदा असल्याचे सिद्ध होत असून येत्या दोन दिवसात ते न हटवल्यास सोमवार, दि.28 जून पासून सर्व विरोधी नगरसेवक फलटण पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या दालनात बांधकाम काढले जात नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असल्याचे, अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन अहिवळे, डॉ.प्रविण आगवणे उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |