04:41pm | Jan 19, 2021 |
वाई : नुकत्याच स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कात्रज-पुणे येथे राज्य कुस्तीगीर परिषदेकडून पार पडलेल्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्रातील ९ महिला मल्लांनी बाजी मारली असून सर्वांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आशिया पदक विजेत्या पै. स्वाती शिंदे (कोल्हापूर) व पै.भाग्यश्री फंड (अहमदनगर) या दोघींना राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
कोरोनाची पार्श्वभूमीवर झालेल्या या स्पर्धेसाठी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. अशी माहिती वाई तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. संतोष वामनराव गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, ओलंपिक वीर मारुती आडकर, तांत्रिक सचिव बंकट यादव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य सुनिल देशमुख, सुरेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवड स्पर्धेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात महिला मल्ल सहभागी झाले होते. ५० किलो वजनी गटात पै. स्वाती शिंदे ५३ किलो गटात पै. नंदिनी साळुंखे, ५५ किलो गटात पै. दिशा कारंडे, ५७ किलो गटात पै. विश्रांती पाटील, ६२ किलो गटात पै. भाग्यश्री फंड, तर ६५ किलो गटात पै. श्रुष्टी भोसले, ६८ किलो गटात पै. ऋतुजा संकपाळ ७२ किलो गटात पै. प्रतीक्षा बागडी आणि ७६ किलो गटात पै. पौर्णिमा सातपुते यांची निवड झाली आहे.
दि. ३० ते ३१ जानेवारी रोजी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या २३ व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी या सर्व महिला मल्लांची निवड झाली असल्याची माहिती पै. संतोष गायकवाड यांनी दिली.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |