05:06pm | Oct 23, 2020 |
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीतील फोर्टीस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
मध्यरात्री 1 वाजता कपिल देव साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. दरम्यान फोर्टीस रुग्णालयाने कपिल देव यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराबद्दल माहिती दिली आहे. फोर्टीस रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल माथूर यांच्या नेतृत्वाखाली कपिल देव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते आयसीयूत असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
61 वर्षीय कपिल देव अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचनही करत असतात. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कपिल देव यांनी 131 कसोटी आणि 225 वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या काळातले सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख असलेल्या कपिल देव यांचा भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा उचलला होता.
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |

डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |