04:14pm | May 25, 2022 |
सातारा : साताऱ्यातील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाच्या घरातून डबल बोर बंदूक व 14 जिवंत काडतुसे चोरी करणाऱ्या भावाबहिणीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली असून ते दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. प्रवीण रामू पवार (वय 19) व त्याची बहीण संगिता विजय राठोड (वय 30, दोघेही मूळ, रा. उडगी, ता. मागेवाडी, जि. विजापूर, सध्या रा. जानाई मळाई मंदिराच्या पायथ्याला, चंदनगर, एमआयडीसी, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 एप्रिल रोजी माजी सैनिक असलेल्या संजय मुरलीधर जातक (मूळ रा. वर्णे, ता. सातारा, सध्या रा. संभाजीनगर, सातारा) यांच्या खोलीतील त्यांच्या नावावर असलेली डबल बोर बंदूक व 14 जिवंत काडतुसे चोरीस जाण्याचा प्रकार घडला होता. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंदुक चोरीचा हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा आदेश दिला होता.
सातारा शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथक त्यानुसार चोरट्यांचा तपास करत असताना एका संशयितास पथकाने जानाई मळाई डोंगराच्या पायथ्याशी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताना प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला अटक करुन तपास करत असताना त्याने बहिणीच्या मदतीने बंदूक व काडतुसे चोरली असल्याचे सांगितले. ती जानाई मळाई डोंगराच्या परिसरात लपवून ठेवले असल्याचे सांगितल्यावर पथकाने त्याच्याकडून जागेवर जावून बंदूक व काडतुसे जप्त केली असून त्याची बहीण ही देखील या चोरीत सहभागी असल्याने दोघांनाही अटक केलेली आहे. हे दोघेही मूळचे कर्नाटक राज्यात असून कामाच्या निमित्ताने साताऱ्यात आलेले आहेत. त्यांनी अजून कोठे चोरी केली आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, कॉन्स्टेबल संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग व सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |