06:59pm | May 27, 2023 |
सातारा : सातारा शहर परिसरात बांधकाम साइटवरील साहित्य तसेच वाहने चोरून त्याची परस्पर विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या आहेत. ही कारवाई दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी केली आहे. विपुल तानाजी नलवडे राहणार करंजे आमराई पार्क, रोहित विश्वनाथ ननवरे बाबर कॉलनी करंजे सातारा, राहुल प्रमोद पवार साई कॉलनी करंजे सातारा अशी संबंधित आरोपींची नावे आहेत.
सातारा शहरातून बांधकाम साइटवरील लोखंडी साहित्य तसेच वाहनांच्या चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार दिनांक 26 मे रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने करंजे येथील आंदेकर चौकामध्ये अल्युमिनियमच्या तारा विक्रीस आणणाऱ्या इसमाची ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हेगार पोलीस अभिलेखावरील असल्याचे स्पष्ट झाले. एका चार चाकी वाहनात त्याचे साथीदार बसले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाहताच मोटारसायकलस्वार व त्याचे साथीदार पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता आम्ही कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनियम ची तार विक्रीसाठी क्वालीस गाडीतून आणल्याचे त्यांनी सांगितले. या वाहना संदर्भात विचारपूस केली असता ते वाहन त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथून चोरी केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांच्या संदर्भातही चौकशी केली असता त्यांनी त्याची माहिती दिली.
संबंधित चोरट्यांनी भोसले मळा, करंजे, विठोबाचा नळ इत्यादी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दोन शाईन मोटार सायकलची चोरी केल्याचे सांगितले. सराईत गुन्हेगारांच्या साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे पथकाने कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता दिनांक 12 मे रोजी झेंडा चौक करंजे परिसरात राहणाऱ्या परप्रांतीयाच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याला मारहाण केली. त्याच्या घरातील पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून नेण्यात आली. त्या पैशातून पल्सर मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट खरेदी केली असल्याची माहिती मिळाली. त्या चोरीच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मोटरसायकल व मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन मोटरसायकल, एक चारचाकी वाहन तसेच एक जबरी चोरीचा गुन्हा असे पाच गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
एकूण या कारवाईत तीन लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये एका अल्पवयीन बालकाचा सहभाग असून तीन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींच्या विरोधात जबरी चोरीचे 16 गुन्हे दाखल असून यापूर्वी शाहूपुरी पोलिसांनी संबंधितांना दोन वर्षासाठी तडीपार केले होते.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |