नागठाणे : काल रात्री पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावचे हद्दीत एका दुचाकीस मालट्रकने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
सारिका तानाजी मोहिते वय ३२ वर्ष रा.नागठाणे ता.सातारा असे मयत महिलेचे नाव असून वैभव विलास सकटे वय :- १९ वर्ष रा.अंगापूर ता.सातारा असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत अज्ञात मालट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराडकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून सोमवार दि.२१ रोजी रात्री ८.३० ते ९ वा. सुमारास सदर वैभव सकटे हा युवक शेंद्रे येथून आपली आत्या हिला दुचाकी क्र.एम एच ११ डी सी ४१५२ वरून घेऊन नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाला असताना भरतगाववाडी गावचे हद्दीत आले असताना चुकीच्या एका शिवशाही बसला विरुद्ध बाजूने ओव्हरटेक करून हा मालट्रक चालकाने भरधाव वेगाने पुढे आला आणि त्याने समोरून निघालेल्या दुचाकी गाडीस जोराने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यावेळी दुचाकीवर बसलेली महिला जोराने रस्त्यावर पडली आणि त्या मालट्रकच्या चाकाखाली गेल्यामुळे ती जागीच मृत झाली. अज्ञात माल ट्रक चालकाने तेथे न थांबता ट्रक सहित तेथून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच हायवे बिट चारचे सचिन पोळ, पी.सी.शिंदे, बी.आर.नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टीकोळे घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणे आरोग्य केंद्रात पाठवून दिले, आणि रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरळीत करून दिली. याबाबतची तक्रार वैभव सकटे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |