सातारा : कराड परिसरासह उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
शाहीद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला वय 28 टोळी प्रमुख, शाहरुख शब्बीर मुल्ला वय 29 दोघेही रा. कोणेगाव तालुका कराड, अमित अंकुश यादव वय 36 राहणार कवठे तालुका कराड अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नोव्हेंबर 2022 पासून सात उपद्रवी टोळ्यांमधील 19 जणांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 नुसार तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रणजीत पाटील यांनी केली होती. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सदर टोळीच्या हालचालीत प्रतिबंध झालेला नाही. सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले होते. सदर टोळीला सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्यामुळेच जनतेमधून त्यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे संबंधित इसमांवर दोन वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपारचा आदेश बजावण्यात आला आहे.
या कामात हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस ना. प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |