11:34am | Jul 10, 2021 |
कराड : वयोवृद्ध हृदयविकारग्रस्त रुग्णांवर काही वेळा बायपास शस्त्रक्रिया करणे धोक्याचे ठरू ठाकते, अशा वेळी या रुग्णांसाठी ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हृदयस्त्रक्रिया करणे अधिक फायदेशीर ठरते. अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी एका 86 वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. अशा प्रकारची जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हासोळी, ता. कराड येथील रहिवासी अनंत कुलकर्णी (वय 86) यांनी छातीत दुखू लागल्याने कराडमधील एका खाजगी रुग्णालयात आपली तब्येत दाखवली. त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी कुलकर्णी यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी कुलकर्णी यांनी डॉ. विजयसिंह पाटील यांची भेट घेतली. त्याठिकाणी त्यांच्या हृदयविकारासंदर्भातील चाचण्या केल्या असता, त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमन्यांमध्ये कॅल्शियमयुक्त प्लाक असल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले व त्यांना बायपास रास्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान करण्यात आले. मात्र कुलकर्णी यांचे वय 86 वर्षे असल्याने, तसेच या वयात मधुमेहासारख्या व्याधी जडल्याने हृदयाची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता कमी झालेली असते. अशावेळी बायपास करणे धोक्याचे असल्याने कुलकर्णी यांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन कुलकर्णी यांच्यावर ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. विजयसिंह पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ही हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन करण्यात आलेली ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच हृदयशस्त्रक्रिया ठरली आहे.
याबाबत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कोविड-19 च्या काळात कृष्णा हॉस्पिटलमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्स, जागतिक दर्जाच्या इन्फेक्शन कंट्रोल पद्धती, स्टाफला दिले जाणारे अद्ययावत ट्रेनिंग, अत्याधुनिक उपकरणे व उपचारपद्धती यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये या अवघड शस्त्रक्रिया पार पाडणे सहज शक्य होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |