फलटण : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या कर्मचा-यांना प्रोत्साहनपर भत्ता देणेबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 31 मार्च 2020 चा आदेश आहे. ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या सर्व अर्धवेळ स्त्री परिचर व आशा गट प्रवर्तक हे ज्या मुख्यालयी काम करत असतील तेथील ग्रामपंचायतीने सदर कर्मचा-यांना प्रति 1000/- रुपये प्रोत्साहनपर भत्ता आदा करावा, असा महाराष्ट्र शासनाने आदेश दिला असताना फलटण तालुका पंचायत समिती प्रशासनाने सदर मदत संबंधित कर्मचा-यांना अजुनपर्यंत का दिली नाही, असा प्रश्न शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनास विचारला आहे.
पाच महिने उलटून गेले तरीही केवळ एका महिन्याची प्रोत्साहनपर रक्कम संबंधित अर्धवेळ स्त्री परिचर यांना आदा करण्यात आली आहे. उर्वरीत भत्ता अजुनपर्यंत दिला गेला नाही. तसेच आम्हाला स्त्री परिचर कर्मचारी वर्गाला ओळखपत्र व गणवेश देण्यात आलेले नाहीत. आमच्याकडे पाच पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. त्यामुळे गावागावात घरोघरी भेटी देत असताना कटु अनुभव व काम करताना अडचणी येत आहेत. जीवावर उदार होऊन काम करणा-या आम्हा महिलांवर अन्याय का असा प्रश्न विचारत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमती सुनिता कोळेकर यांनी त्यांच्या सहकारी स्त्री परिचर कार्यकर्त्यांसह सासवड (झणझणे) येथे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन 28 जुलै 2020 रोजी दिले आहे.
मागणी निवेदन हातात घेताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे या दोन्ही अधिका-यांशी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी मोबाईलवरुन संपर्क साधून सदर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. त्यावर दोन्ही अधिका-यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमिता गावडे यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी 12 जुन 2020 च्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा दाखला देत सदर रक्कम आदा करण्याची प्रक्रिया 15 जुन 2020 पर्यंत पुर्ण करावी असा आदेश सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले होते. परंतु त्यांच्या आदेशाला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. सदर प्रकरणात दिरंगाई झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सदर कर्मचारी वर्गावर अन्याय झाला आहे. आता जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणा-या सातारा जिल्ह्यातील सर्व अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचारी वर्गाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचेकडे केली आहे. तात्काळ न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने शिवसैनिक आक्रमक आंदोलन हाती घेऊन सडेतोड उत्तर देतील असे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे सांगितले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |