सातारा : प्रदीप धुमाळ यांना अधिसंख्येचे आदेश देण्यासह सेवानिवृत्तांना पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र ने आजपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, अनुसूचित जमातीचे अस्सल जात प्रमाणपत्र वादग्रस्त असलेल्या पडताळणी समितीकडून फसवणूकीने रद्द व जप्त करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या दि.६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात 'पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा' असे आदेश दिलेले नसताना राज्यातील १२,५०० सेवेत कायम असणा-या व वेळोवेळी विविध शासन निर्णयाने सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांना दि. २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये ११ महिन्याच्या तात्पुरत्या सेवेवर वर्ग करणे, सुमारे १००० सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना गेल्या ३१ महिन्यांपासून पेन्शन न देणे तसेच मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन व इतर लाभ न देणे, यासारखा अन्याय आमच्या कर्मचा-यांवर होत आहे.
वादग्रस्त अनु. जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कारभाराची चौकशी करावी, अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करावी, अधिसंख्या वृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसाला पेन्शन व इतर लाभ देण्यात यावे, कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता व इतर सेवा विषयक लाभ घेण्यात यावे, महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व याचिका परत घ्याव्यात या मागणीसाठी आम्ही उद्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ अधिसंख्य, सेवानिवृत्त कर्मचारी व वृत्त कर्मचाऱ्यांचे वारसदार, सेवा समाप्त कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करीत आहेत.आंदोलनात तानाजी धुमाळ, आशा सूर्यवंशी, वनदेव ठीगळे, मच्छिंद्रनाथ माने, सौ. नगनथने आदींनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |