09:18pm | Jan 29, 2022 |
फलटण : बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बरड, ता. फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद, केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण १५ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ जानेवारी २०१८ रोजी बरड ता. फलटण गावच्या हद्दीत बापुराव रामा लंगुटे रा. बरड यांचा पुतण्या गणेश विठठल लंगुटे व भाऊ विश्वनाथ रामा लंगुटे दोन्ही रा.बरड ता.फलटण यांनी त्यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व मालमत्ता क्रमांक 1625 यांची नोंद करताना, ग्रामपंचायत बरड यांना दिलेले 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर गट नं.54 मधील इतर मिळकत धारक व बापुराव रामा लंगुटे यांच्या नावावर खोटया सहया व अंगठे करुन, बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन, बरड येथे असणाऱ्या गाळयांची नोंद करण्याकामी, ग्रामपंचायत बरड यांना 100 रुपयाचे संमतीपत्र व अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले व ग्रामपंचायत बरडचे तत्कालीन ग्रामसेवक दतात्रय सोपान भोसले रा. घाडगेवाडी ता. फलटण व दि.16/01/2018 रोजीच्या मासीक मिटींग कामी हजर असणारे ग्रामपंचायतीचे सरंपच तृप्ती संतोष गावडे, उपसरपंच गोरख बबन टेंबरे, सदस्य सौ.माधुरी गणेश लंगुटे, प्रीतम विठठल लोटे, रतन गुणवंत बागाव, गजानन रामदास गावडे, हेमलता हणमंत गावडे, कमल सुभेदार लोंटे, रुक्मीणी तुकाराम शिंदे, शेखर दिलीप काशिद, वनिता अण्णा लंगुटे, सचिन गजानन हाके सर्व रा. बरड ता.फलटण यांनी सर्वांनी आपआपसात संगनमत करुन, बरड ग्रामपंचायती मध्ये गणेश विठठल लंगटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व विश्वनाथ रामा लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1625 या गाळ्यांची बेकायदेशीर नोंद घेण्यात आली असल्याची फिर्याद बापुराव रामा लंगुटे वय ६२ वर्षे रा. बरड ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |