04:39pm | Jul 14, 2020 |
नवी दिल्ली: भारताच्या बहिष्कार अस्त्राने घायाळ झालेल्या कुरोपतखोर चीनने आता वेगळी चाल खेळण्यास सुरूवात केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने संशय व्यक्त केला आहे की, चीन सध्या हॉगकाँग मधून भारतात वस्तू पाठवत आहे.
करोना व्हायरस आणि त्यानंतर सीमेवरील तणाव यामुळे देशात चीन विरोधी वातावरण आहे. चीनने सीमेवर केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांना चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. काही व्यापारी संघटना देखील यात पुढाकार घेत असून केंद्र सरकार देखील विविध प्रकारे चीनी वस्तू देशात कमी येतील यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच चीनची एक चालाखी समोर आली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिक, व्यापारी यांचा बहिष्कार त्याच बरोबर सरकारी पातळीवर घेण्यात आलेली दखल यामुळे चीनी वस्तूंच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच चीनने हाँगकाँग मधून भारतात वस्तू पाठवण्याच सुरूवात केल्याचा संशय कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने व्यक्त केलाय. हाँगकाँगमधून भारतात होणार्या आयतीवर अप्रत्यक्षरित्या झालेल्या वाढीवर कॅटने काळजी व्यक्त केली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तूची मागणी असावी यासाठी चीन हाँग काँगच्या मार्गे आयत करत आहे. या गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी कॅटने केली आहे.
कॅटने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना एक पत्र पाठवले असून हाँगकाँगवरून होणार्या आयातीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या देशांना ट्रान्सशिपमेंट हब म्हणून चीन त्यांच्या वस्तू भारतात पाठवू शकतो. अशा देशांसोबत भारताने केलेल्या मुक्त व्यापार करार, अन्य करार आणि व्यापारासंदर्भात दिलेल्या सवलती आदीचा विचार करावा. जर त्यात काही त्रूटी असतील तर त्यावर उपाय योजना करावी.
भारतात प्रवेश मिळवण्यासाठी चीन आयात मार्ग बदलत आहे. याकडे तातडीने लक्ष्य देण्याची गरज असल्याचे कॅटने म्हटलेय. हाँगकाँगमधून आयात होणार्या वस्तूंवर नजर ठेवावी आणि शक्य झाले तर त्यावर आयातीवर जबरी शुल्क आकारावे अशी कॅटची मागणी आहे. हाँगकाँगसह दक्षिण आशियाई देशातून होणार्या आयातीवर लक्ष्य ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलय.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |