पाटण : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाटण सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा १४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयानंतर पाटणकर समर्थकांकडून जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पाटण सोसायटी मतदारसंघातील एकूण १०२ मतदार आहेत. मतांपैकी ५८ मते सत्यजितसिंह यांना तर ४४ मते ना. देसाई यांना मिळाली आहेत. पाटणकरांनी स्वतः ची मते अबाधित ठेवून विरोधकांची मते फोडण्यात यश मिळवल्याच्या सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत. सत्यजितसिंहाची जिल्ह्यातील दमदार एंट्री आणि ना. देसाईंचा धक्कादायक पराभव राज्यात आश्चर्य व्यक्त करणारा ठरला असून आगामी राजकारणासाठी पाटणकर गट आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा विजय टॉनिक ठरणार असल्याची चर्चा आहे.
जिल्हा बँकेसाठी पाटण सोसायटी मतदार संघातून पहिल्यांदाच स्वतः ना. देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर एकमेकांसमोर उभे होते. देसाई-पाटणकर या गटाच्या पारंपरिक लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राज्यात व जिल्ह्यात ना. देसाईंचा दबदबा लक्षात घेता येथे ना. देसाई सहजपणे विजयी होतील, अशीच शक्यता होती. त्याचवेळी राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्यजितसिंहांनी शांत, संयमी व धोरणात्मकपणे ही निवडणूक हाताळली. तसेच आपले मतदार फोडण्यात ना. देसाई व समर्थकांना यश मिळू दिले नाही.
सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयाची बातमी समजताच संपूर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक जल्लोष व्यक्त करण्यात आला. सकाळी ९ वाजण्यापूर्वी हा निकाल समजल्याने अनेक पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्त्यांनी थेट सातारा, उंब्रजकडे प्रस्थान केले. उंब्रज पासून ते पाटणपर्यंत प्रचंड महारॅली काढून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, घोषणा देत हजारो समर्थकांनी महामार्गावर विजयोत्सव साजरा केला. पाटण शहरातही या निमित्ताने दिवाळीचे वातावरण पाहायला मिळाले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |