03:15pm | Jul 31, 2020 |
सातारा: सातारा जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना सुविधा मिळावी यासाठी गेली पाच वर्षांत 40 कोटी रूपये निधी खर्ची करण्यात आला. परंतु लोकांचे आरोग्य बिघडत चालले असून आरोग्याच्या नावावर व्यावसायिक, ठेकेदारांनी चांगलाच मलिदा लाटला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे असेच ठरू लागले आहे.
सध्या सातारा जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजाराचा टप्पा गाठण्यासाठी आतूर झालेली आहे. आतापर्यंत 130 जणांना आपला प्राण गमावावे लागले आहेत. ही बाब जिल्हासाठी भूषनावह नाही. क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात दोन दिवसांपेक्षा अधिक काळ अंत्यविधीविना कोरोनाबाधितांचा मृतदेह पाहून नागरिकांचेही अवसान गळू लागले आहे. दिवदिसेंदिवस रूग्ण व कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलेली आहे. वैद्यकीय सुविधा पुरविण्याची पहिली पायरी म्हणजे रूग्णवाहिका आहे. सातारा जिल्हयात 75 रूग्णवाहिका सेवेसाठी आहेत. त्यामध्ये देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केलेल्या बीव्हीजी कंपनीच्या 36 रूग्णवाहिका 108 सेवा म्हणून प्रसिध्द आहेत. रूग्णांना शासकीय रूग्णालयात तातडीने उपचार होण्याऐवजी एखादी मालवाहतूक करणारे वाहन टोल वाचविण्यासाठी दुसरा मार्ग स्विकारते तशा पध्दतीने काही रुग्णवाहिका टोल पदरात पाडून घेण्यासाठी रुग्णाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात धन्यता मानत आहे. ही बाब सुध्दा प्रकर्षांने पुढे आलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागाबाबत प्रस्ताव मंजुरीस पाठवलेला आहे. लवकरच पाठपुरावा करून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अशी पत्रकबाजी होत असते. परंतु गेल्या आठवड्यात कॉम्प्रेसर उपलब्ध न केल्याने वेंटिलेटर यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रा रंगू लागली आहे. परंतु याबाबत कुणीही भाष्य केले नाही. तसाच प्रकार रूग्णवाहिकेवर काम करणार्या वाहनचालकाबाबतही घडू लागलेला आहे. एका नामांकित कंपनीतील वाहनचालकाला बारा-बारा तास रूग्णवाहिकेवर सेवा द्यावी लागत आहे. त्या मोबदल्यात त्यांना महिन्याला 15 हजार रूपये वेतन मिळत आहे. इतर ठिकाणी रूग्णवाहिका चालकांना 8 तास सेवा करावी लागत. याला अपवाद सातारा जिल्हा ठरला आहे. कारण इतर जिल्ह्यांमध्ये रूग्णवाहिका चालकांना आरोग्य सुविधा व चांगले वेतन मिळत आहे. सातारा जिल्हयाबाबतच दुजाभाव का? असा प्रतिप्रश्न सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. सध्या रूग्णवाहिकेचे नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले असून अत्यावश्यक रूग्णांना अडचणीच्या काळात मृत्यूपर्यंत पोहोचवणे सोपे होईल अशा पध्दतीने या रूग्णवाहिका धावत आहेत. ही बाब सुध्दा गंभीर आहे. आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यातील परिस्थितीबाबत योग्य पाऊल न उचलल्यास ना ईलाजास्तव तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, शिवसेनेचे संदिप पवार व ब्ल्यू फोर्सचे राजेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |