11:01pm | Aug 12, 2020 |
सातारा : निलंबनानंतर सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाने आज सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा या पदाचा कार्यभार स्वीकारला.
सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांच्याबाबत सातत्याने तक्रारींचा सूर वाढला होता. त्यांच्याविरुद्ध अनेक आंदोलनेही झाली होती. जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमधून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तीचे पलायन, अनुमानित आणि बाधित व्यक्तींवर उपचार केल्यानंतर मोकळी इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या, सुया आदी कचरा उघड्यावर टाकून देणे, रुग्णालयाच्या ड्रेनेज पाईपमध्ये मृत अर्भक सापडणे या घडलेल्या सलग तीन घटना प्रसिद्धीमाध्यमांनी प्रकाशझोतात आणल्यानंतर आमोद गडीकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान गडीकर यांच्या कारभाराचा भांडाफोड झाल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. या घटनेला काही दिवस उलटतात तोच आज महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातील आरोग्य सेवा संचालक श्रीमती डॉ. साधना तायडे यांनी पुणे परिमंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालक यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांना शासन पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की डॉ. आमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक, सामान्य रुग्णालय सातारा यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा अतिरिक्त कारभार पाली, जि. रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष जयसिंग चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून तसा अहवाल शासन व आरोग्य सेवा आयुक्तालयाला विनाविलंब सादर करण्यात यावा अशा सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, डॉ. सुभाष जयसिंग चव्हाण हे पाली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावरुन कार्यमुक्त झाले असून चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा या पदाचा कार्यभार स्वीकारला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |