10:29pm | Jun 03, 2020 |
सातारा : बुधवारी सकाळी साताऱ्यात दाखल झालेल्या निसर्ग वादळाने सातारकरांची पुरती दैना उडवली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडांसह जाहिरात फलकांची पडझड झाली. दरम्यान महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडला असून उद्या गुरुवारी दुपारपर्यंत निसर्ग वादळाचा मुक्काम जिल्ह्यामध्ये राहणार असल्यामुळे प्रशासनाने सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
बुधवारी सकाळीच महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर निसर्ग वादळ धडकल्यानतंर त्याचे पडसाद सर्वदूर उमटले. साताऱ्यात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वादळापाठोपाठ पावसाने हजेरी लावली. काही वेळातच पावसाने उग्ररुप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदर बझार येथील जिल्हा रुग्णालय नजिक रस्त्यावर झाड कोसळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती, मात्र बाधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ते झाड हटवले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजिक एका दुकानावरील जाहिरात फलक कोसळला.
सकाळी १० वाजता वादळी वाऱ्याला सुरुवात होताच विज महामंडळाने विद्युत पुरवठा खंडित केला होता.
सातारा जिल्हा प्रशासनाने मंगळवारी नागरिकांना आवाहन करीत घरीच थांबण्याचे आवाहन केल्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून येत होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाऊस ओसरल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडला असून फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि कराड या तालुक्यातून वादळी वाऱ्यासह पावसाने उपस्थिती लावली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |