नवी दिल्ली : प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएम-श्री) योजनेच्या अंतर्गत देशातील १४,५०० शाळांचा विकास केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सोमवारी केली. ते म्हणाले की, या शाळा नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तत्त्वांना साजेशा असणार आहेत. तिथे आधुनिक तंत्रज्ञानविषयक सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने शिकविण्याचे काम या शाळांतून होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांतील शोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम या १४,५०० शाळांनी करावे. त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. मोदी म्हणाले की, शाळा, वर्ग व घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींतील विसंगती लक्षात आल्यानंतर मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीट मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप व्हावे, असेही मोदी यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे मार्गदर्शक
शिक्षकांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा नेहमी वाचला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना जे प्रश्न पडतात, त्याची उत्तरे शोधण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थ्यांनीही नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी चर्चा केली पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |