12:47pm | Jul 08, 2021 |
पुसेगाव: डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत खटाव तालुक्यावर अन्याय करणार्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे गणेश भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, खटाव तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय (S C) प्रवर्गातील शेतकर्यांवर अन्याय करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत सरसकट मागासवर्गीय शेतकर्यांना सिंचन विहीर योजनेचा लाभ देण्यात येत होता. त्यामुळे मागासवर्गी शेतकर्यांचे जीवनमान योजनेतून सुधारत होते.
परंतु शासनाच्या वरिष्ठ भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सातारा पत्र जाक्रवभुवै/मुस्लिम/सा/ता/डॉ.बा.आं.कृ.स्वा.यो./401/21दि.2-6-2021 नुसार खटाव तालुक्यातील 141 गावांपैकी 137 गावे यामध्ये या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. या योजनेमध्ये सुधारणा करण्यात यावी. अशाप्रकारे मागासवर्गीय समाजातील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणार्या करणार्या अधिकार्यांची चौकशी करावी. या योजनेमुळे मागासवर्गीयांचा लाखो करोडो रुपयांचा निधी अखर्चित राहणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील सर्व मागासवर्गीय (S C) शेतकर्यांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा.
या योजनेमुळे मागासवर्गीयांना पाणी साठवून ठेवण्याची जागा उपलब्ध होईल. दुष्काळाची झळा सोसत असणारा खटाव तालुका या योजनेमुळे जलमय होईल. या विषयावर योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे निवेदन देताना तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले, जेष्ठ जिल्हा नेते अजित नलावडे, महेंद्र माने, संदीप काळे, रवी इंजे, सागर जावळे, अजित कंठे, दत्ता शिंदे, बबन खैरमोडे, शाहनवाज काझी, ग्रा.सदस्य सचिन उमपे, अभिजित बोकडे, शरद भोसले यांच्यासह खटाव तालुक्यातील रिपाईचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |