04:32pm | Apr 05, 2021 |
वॉशिंग्टन: कोरोना संकटाने संपूर्ण जग जेरीस आले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या दोन आठवड्यात संपूर्ण जगभर कोरोना महामारी थैमान घालणार आहे.
मायकल ओस्टरहोम हे मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इंफेक्शियस डिजीज रिसर्च अॅण्ड पॉलिसी विभागाचे संचालक आहे. अमेरिकन वाहिनी एनबीसीसोबत बोलताना त्यांनी हा अंदाज वर्तवला. ओस्टरहोम यांनी सांगितले की, करोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या बाधितांपेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारस डिसेंबर 2020 मध्ये सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. लसीकरणानंतर करोना संसर्गाला काही प्रमाणात अटकाव झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, भारत, अमेरिका, ब्राझील, इटली आणि जर्मनी आदी देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे संपू्र्ण जगात चिंतेचे वातावरण आहे.
ओस्टरहोम यांनी पुढे म्हटले की, पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारख्या परिस्थितीचा सामना संपूर्ण जग करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्याचे उपाय वेगाने वाढवण्याची आवश्यकता आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर केल्यास बाधितांच्या वाढत्या संख्येला अटकाव करता येऊ शकतो.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |