पुसेगाव: कोरोना संकटकाळापूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की, बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतय का? होसेला मोल नाही. त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची.
बँड व्यवसाय हा त्यापैकीच एक व्यवसाय. समाजासाठी जीवनावश्यक नाही पण ज्यांचे पोट त्याच्या वर आहे. त्यांच्यासाठी रोजीरोटीचे साधन आणि हीच रोजीरोटी कोरोनामुळे हिरावून घेतली आहे.
गेली वर्षभर बँड व्यवसाय ठप्प आहे. या व्यवसायावर अवलंबून असणार्या वर उपासमारीची वेळ आली आहे. बँड मधील मंडळी म्हणजे कलाकार, गायक वादक इ. अनेक प्रकारचे कलाकार बँड व्यवसायला लागतात. आतां इतके वर्ष बँड व्यवसायामध्ये काम केल्यामुळे, दुसरा कोणता व्यवसाय करणे शक्य नाही.त्यामुळे बँड व्यवसाय करणार्यांची पूर्ण कोंडी झाली आहे. आपले घर कसे चालवायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने धान्य दिले तरी बाकीच्या खर्चाचे करायचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.कुठून पैसे आणायचे?
आम्ही गेली 30 वर्षे बँड व्यवसायामध्ये आहोत. आमच्याकडे 2 बँडचे संच आहेत. 40 च्या आसपास कलाकारांचा संच आहे. त्यातून वर्षाला अंदाजे 10 लाख उत्पन्न मिळते. या व्यवसायावर 40 ते 50 माणसाचे कुटुंब चालते. कर्ज काढून आम्ही अंदाजे 25 ते 30 लाखाचे भांडवल या धंद्यात गुंतवले आहेत. पण गेल्या वर्षभरात कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. देणी अडकली आहेत. कर्ज थकली आहेत.ही 40-50 कुटुंब आमच्या व्यवसाय वर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या व्यथा समजून घ्यावेत व आम्हाला किमान जगण्यासाठी तरी मदत करावी. कर्ज मुदत वाढवून मिळावी. कर्जाचे व्याज माफ करावे.आम्हाला कलाकार मानधन द्यावे, अशी मागणी निढळ (ता.खटाव) येथील प्रसिद्ध बँड व्यावसायिक अमोल बँडचे मालक अमोल भोंडवे यांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |