09:42pm | Aug 04, 2021 |
वाई : वाई एमआयडीसीतील कंपनीतून चोरीप्रकरणी वाई पोलिसांनी आणखी 4 महिलांना अटक केली आहे. सौ.छाया रमेश गोसावी वय 40, सौ. सुवर्णा विश्वनाथ गोसावी वय 29, सौ. मेघा किरण मोरे वय 30 वर्ष व सौ. छाया प्रताप गोसावी वय 40 सर्व रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत. याच गुन्ह्यात यापूर्वीही 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, मार्च 2020 ते दि 15 जुलै 2021 पर्यंत वाई एमआयडीसी येथील मे.साईपर्ण सिट्स प्रा.लि. कंपनीमध्ये आरोपींनी वॉल कंम्पाऊन्डवरून व उघड्या दरवाजामधून आत प्रवेश करुन रुफिंग शीट्स बनवण्याची जर्मन मेक थायसन एक्सक्युझन ट्विनस्कु कंपनीची मशीनमध्ये असणारे पार्ट्स, इलेक्ट्रीक मोटारी, स्विच तसेच पीव्हीसी शिट्स बनवण्याकरीता लागणारे कच्चे मटेरीयल असे साहित्य एकूण 6 लाख 08 हजार 500 किंमतीचा माल चोरुन नेला होता. तसेच मशीनचे मुख्य पार्ट व वायरींग, इलेक्ट्रीक साहित्याची मोडतोड करुन नुकसान केले होते. याबाबत डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाई बोपर्डी एमआयडीसी परीसरात पेट्रोलींग करुन त्याच दिवशी 5 महीला व पुरुष आरोपींना अटक केली होती. या चोरीचा कालावधी सुमारे 1 वर्षाचा असल्यामुळे यामध्ये आणखी आरोपी सहभागी असल्याची माहीती पोलिसांना मिळालेली होती. यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाने दि. 02 रोजी वाई एम.आय.डी.सी.परिसरात संशयास्पदरित्या फिरणारया 4 महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मे.साईपर्ण सिट्स प्रा. लि. नावचे कंपनीमध्ये चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. तपासादरम्यान सदर आरोपींनी या कंपनीमधील चोरून विकलेला व त्यांचे ताब्यात मिळालेला सुमारे 4,25,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 400 किलो तांब्याच्या तारा व 25,00 किलो लोखंडी रॉड हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंदराव खोबरे, स.पो.फौ. विजय शिर्के, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, पो.कॉ.किरण निबाळकर, पो.कॉ.श्रावण राठोड, पो.कॉ.गोळे .म.पो.ना. सोनाली माने, म.पो.कॉ. शितल साळुखे यांनी केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |