09:30pm | Apr 11, 2023 |
उंब्रज : उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर उंब्रज पोलिसांनी कारवाई करीत माहिती अधिकाराचा गैरवापर करून खंडणी मागणाऱ्या खंडणी बहाद्दर महेश उर्फ बंडा काशीदला अटक केली आहे.
महेश काशीद याच्यावर उंब्रज पोलीस स्टेशनला गेल्या महिन्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर हृदयाच्या आजाराचे कारण देत सातारा हाॅस्पीटल सातारा या खाजगी हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट होऊन उपचार घेत असताना त्याच दरम्यान त्याने आजाराचे कारण देत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
आरोपी महेश काशीद याच्याविरूद्ध सन 2020 मध्ये उंब्रज पोलीस स्टेशनला माहिती अधिकाराच्या कारणावरून त्रास दिल्यावरून ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल होता. त्यावेळेसही हृदयाच्या आजाराचे कारण देत तो कराड येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यात यशस्वी झाला होता. महेश काशीद याने यावेळीही माहिती अधिकाराचा गैरवापर करून खंडणी गोळा करून गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी ॲडमीट होऊन जामीन घेण्यासाठी प्रयत्न चालु केला होता. परंतु सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व उंब्रज पोलीस टीमने महेश काशीद याच्या बेकायदेशीर कृत्याबाबतचे पुरावे सत्र न्यायालयात सादर केल्याने सत्र न्यायालय कराड यांनी आरोपींचा जमीन अर्ज दि. 13 मार्च रोजी फेटाळला होता.
यानंतर महेश काशीद हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सातारा येथील हाॅस्पीटल मधुन पुणे येथे खाजगी हाॅस्पीटल मध्ये ॲडमिट झाला होता व हायकोर्टात त्याने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
जामीनावर हायकोर्टात सुमारे एक तास सुनावणी झाली. सुनावणी मध्ये उंब्रज पोलीस टीमने आरोपी माहिती अधिकाराचा वापर करून कशाप्रकारे खंडणी गोळा करत आहे, याचे पुरावे व वाचण्यासाठी हाॅस्पीटल चा कसा वापर करत आहे, ही बाब भक्कमपणे सरकारी वकील मार्फत मांडल्यानंतर हायकोर्टाने महेश काशीद चा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला.
महेश काशीद याला खाजगी डाॅक्टरांनी बेड रेस्टची दिलेली मुदत संपल्यानंतर आज रोजी उंब्रज पोलीस स्टेशन टीमने आरोपी महेश काशीद याला अटक केली. अटकेनंतर त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांच्या समोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व उंब्रज पोलीस करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |