05:33pm | Jun 20, 2021 |
फलटण : जिंती, (ता. फलटण) गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियानी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ करूनही पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिंती (ता. फलटण) गावचे पत्रकार प्रशांत रणवरे हे बातमी करण्यासाठी गेले होते. यानंतर ते जिंती गावाच्या बसस्टँडवर थांबले होते. त्यावेळी प्रमोद रणवरे व इतर दोन वाळू माफियांनी महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी तू वाळू उपसाची माहीती देतो असे मला त्यांनी सांगितले आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याची घटना घडल्यानंतर पत्रकार प्रशांत रणवरे ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यासह तालुक्यातील पत्रकार यांनी याप्रकरणी कडक भूमिका घेत वाळू माफिया यांना चुकीची माहिती देणाऱ्या जबाबदार महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची करण्याची व पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी या घटनेच्या निषेधार्थ एकत्रित येत या घटनेचा निषेध करून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांना पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी जाब विचारत आरोपीला कोणत्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रकार रणवरे यांच्याबाबत वाळू माफियांना चुकीची माहिती दिली, याबाबत चौकशी करण्याची मागणी करत पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवार दिनांक 22 रोजी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला. पोलिस अधिकारी यांनी कायद्याच्या पळवाटा न काढता याप्रकरणी कठोर कारवाई न केल्यास पत्रकारांच्या रोषाला समोर जावे लागेल, असेही यावेळी पत्रकारांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
विविध विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर अवैध धंदे, वाळू माफिया, जुगार, मटका, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही पत्रकार यांचा काडीमात्र संबंध नसताना पत्रकार यांचे नावे पुढे करत असून अनेकवेळा पत्रकारांच्या नावाखाली कारवाई करण्याची भीती दाखवत आर्थिक मागणीही करत असल्याची बाब समोर येत असल्याचे यावेळी बैठकीत निदर्शनास आणून दिले. यापुढे विनाकारण पत्रकारांची नावे पुढे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा पत्रकार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही पत्रकारांच्या विरोधात गंभीर घटना घडल्यास त्यास खंबीरपणे उत्तर दिले जाईल, असे सांगण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, रमेश आढाव, सुभाष भांबुरे, राजेंद्र भागवत, नसीर शिकलगार, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, यशवत खलाटे, बाळासाहेब ननावरे, बापूराव जगताप, प्रकाश सस्ते, संजय जमादार, युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, दीपक मदने, विकास अहिवळे, राजेंद्र गोफने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, उमेश गार्डे, शेखर जगताप, अमिरभाई शेख, उद्धव बोराटे, विठ्ठल शिंदे, संजय गायकवाड व इतर पत्रकार उपस्थित होते.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनीही प्रशांत रणवरे यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन यांना विनंती केली आहे, असे सांगितले.
गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांना मुजोर वाळू माफियावर कडक कारवाई करण्याची सूचना दिल्या. तसेच फलटण शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांना फलटण तालुक्यातील पत्रकार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |