01:50pm | Jul 09, 2020 |
मुंबई: महाविकास आघाडी सरकारं ‘सारथी’ संस्थेकडं दुर्लक्ष केलं असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केल्यानंतर आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाजीराजे याना तिसर्या रांगेत स्थान दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. हा तर छत्रपतींचा अपमान आहे अस म्हणत बैठकीत जोरदार खंडाजंगी झाली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा त्रागा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती. संभाजीराजेंनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
पूर्वनियोजित वेळेनुसार मंत्रालयात पहिली बैठक सर्व प्रतिनिधींसोबत होणार होती. अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार हे देखील बैठकीला उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच आसन व्यवस्थेवरून गोंधळ सुरू झाला. व्यासपीठावर अजित पवार, विजय वडेट्टीवार व नवाब मलिक हे बसले होते. तर, संभाजीराजे हे तिसर्या रांगेत बसले होते. त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ झाले.
‘छत्रपतींचा हा अपमान आहे. छत्रपतींना तिसर्या रांगेत बसवून तुम्ही खुशाल व्यासपीठावर कसे बसता,’ असा प्रश्न एका कार्यकर्त्यानं मंत्र्यांना केला. अजित पवार यांनी यात मध्यस्थी करत संबंधित कार्यकर्त्यास शांत राहण्यास सांगितलं. ‘तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत की वाढवायचे आहेत? हे मंत्रालय आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
अखेर संभाजीराजे यांनी मध्यस्थी केली. मी बाहेर जाऊ का, असा प्रश्न त्यांनी गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांना विचारला. तरीही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. ‘छत्रपतींना खाली बसायला लावलं असताना तुम्ही काय करत होता, असा प्रश्न लोक आम्हाला विचारतील. तोंड दाखवायला जागा राहणार नाही,’ असं कार्यकर्ते म्हणाले. मात्र, संभाजीराजे यांनी समजावल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर दुसर्या टप्प्यातील चर्चा अजित पवार यांच्या दालनात घेण्याचा निर्णय झाला.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |