12:34pm | Sep 08, 2020 |
वॉशिंग्टन: यंदाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होणार आहे. निवडणुकीच्या विजयासाठी सट्टेबाजांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती दर्शवली आहे. तर, निवडणूक सर्वेक्षणात बायडन यांनी पसंती मिळाली आहे. अमेरिकेतील प्रत्येक समाजघटकाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत अमेरिकन-हिंदू मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ट्रम्प आणि बायडन यांनी हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध मार्ग अवलंबले आहेत. अमेरिकेत जवळपास 20 लाख हिंदू मतदार आहेत. बायडन यांनी ’हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ अशी मोहीम सुरू केली आहे. बायडन यांनी हिंदू समुदायावर होणारे अन्याय आणि भेदभावाच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर, ट्रम्प यांनीदेखील अशाच पद्धतीने हिंदू अमेरिकन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात होणार्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाच्यावतीने माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांच्यात सरळ निवडणूक होणार आहे. अमेरिकेत राष्ट्रीय अथवा स्थानिक निवडणुकीसाठी सट्टेबाजी अवैध आहे. त्यामुळे सट्टेबाजीशी निगडीत सर्व व्यवहार परदेशी वेबसाइटवर होत आहेत.
निवडणूक सट्टेबाजी बेकायदेशीर असल्यामुळे अमेरिकन नागरीक गुप्तपणे सट्टा लावत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सट्टेबाजारानुसार ट्रम्प यांच्यावर पैसे लावणार्यांना 90 टक्के अधिक फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
एका ब्रिटीश सट्टेबाजाने सांगितले की, ट्रम्प यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. ट्रम्प यांच्या बाजूने आतापर्यंत सुमारे 95 कोटींहून अधिक रुपये लावण्यात आले आहेत. तर, आयलँडच्या एका सट्टेबाजानुसार ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे लावण्यात आले आहे. त्यामुळे सट्टा बाजारातील मंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक पैसे लावले जात असल्याचे ऑस्ट्रेलियन सट्टेबाजाने सांगितले.
तर, निवडणूक सर्वेक्षणात डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर आहेत. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जवळपास 10 टक्के मतांचा फरक असल्याचे निवडणूक सर्वेक्षणात आढळले आहे. मात्र, ट्रम्प हे निवडणूक प्रचारा दरम्यान आघाडी घेतील आणि पुन्हा विजयी होतील असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तशी परिस्थिती ट्रम्प यांच्या पारड्यात जाणार असल्याची चर्चा आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |