08:32pm | May 24, 2022 |
सातारा : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती व्हर्च्युअल बैठक मंगळवार, दिनांक 24 मे रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी या व्हर्च्युअल बैठकीसाठी हिंदवी पब्लिक स्कूल, आंबेदरे रोड, शाहूपुरी या ठिकाणी एकत्र जमले होते. साताऱ्यात या बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवी पवार, किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्या मानिषाताई पांडे, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाड्या जिल्हा संयोजक, मोर्चे जिल्हा अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, मंडल मोर्चा अध्यक्ष, मोर्चा जिल्हा सरचिटणीस, आघाड्या जिल्हा सहसंयोजक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार 30 मे 2022 रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षाचा कालावधी घेऊन मोदी सरकारचा कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत त्याची माहिती आणि मार्गदर्शन या बैठकीमध्ये करण्यात आले. मोदी सरकारच्या कामाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन 30 मे रोजी करण्यात येणार आहे. यावेळी निवडक क्षेत्रातील लाभार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायिक यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्यांना मोदी सरकारच्या कामाचे प्रगती पुस्तक आणि स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तयार केले जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली जाणार आहे. तसेच पक्षाचे सर्व आमदार, खासदार, प्रदेश, जिल्हा,मंडल पदाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन जनसंपर्काची व्यापक मोहीम पूर्ण करावयाची आहे. या मोहिमेमध्ये मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी संवाद, पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्रभातफेऱ्यांचे आयोजन, प्रभावशाली व्यक्तींबरोबर स्नेहभोजन, विविध समाजघटकांची म्हणजे शेतकरी, महिला, वंचित घटक, अनुसूचित जाती, जमाती, शहरी भागातील गरीब, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या आरोग्य स्वयंसेवकांचा सन्मान कार्यक्रम, देशासाठी हुतात्मा झालेल्यांचे कुटुंब दत्तक घेणे यासारख्या कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे.
युवा मोर्चा तर्फे प्रत्येक जिल्ह्यात विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. याचवेळी मोदी सरकार आणि एनडीए सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना भेटी देण्यात येतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मध्यप्रदेशातील महू येथून बाबासाहेब विश्वास रॅलीची सुरुवात करण्यात येईल. तसेच अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीतून अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी केलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली जाईल. झारखंडमधील रांची येथे बिरसा मुंडा रॅली आयोजन करण्यात येईल. आदिवासींचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये मेळाव्याचे आयोजन करून आदिवासींसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली जाईल. अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने संपर्क अभियान आयोजित करून मोदी सरकारने अल्पसंख्यांकासाठी घेतलेल्या विविध योजनांची निर्णयांची माहिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी गरीब कल्याण जनसभा या नावाने भव्य सभेचे आयोजन करण्यात येईल. मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजना वर आधारित अभियान गीत तयार करून विविध प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ते रूपांतरित केले जाईल. मोदी सरकारच्या योजनांचा लाभार्थी विषयीच्या बातम्या, चित्रफिती जनकल्याण कार्यक्रम प्रसिद्ध केले जातील. वेगवेळ्या वर्तमानपत्रातून, व्हिडिओ न्यूज चॅनल मधून, विविध रेडिओ चॅनल वरून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या बातम्या चित्रफिती जिंगल्स प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी ठरवण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |