01:32pm | Sep 24, 2022 |
कराड : शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचार्यांनी झोकून केलेले काम, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगरपरिषद पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यासाठीचे निमंत्रण कराड नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.
शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणासाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्याचे योग्य नियोजन या बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. सलग चार वर्षे नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातत्याने अव्वल राहिली आहे. या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए. आर. पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी झोकून देवून काम केल्याने देशात कराड नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे.
दिल्ली येथे २९ व ३० सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबविलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले असून कराड नगरपालिका या प्रदर्शनात भाग घेणार आहे. दोन दिवसांच्या प्रदर्शनानंतर एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |